मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

खंड ४ था.

श्री.

नारायणव्यवहारशिक्षोपक्रम.
श्रीगणेशायनम: । श्रीगोपालकृष्णायनम: । श्रीगुरुभ्योनम: ।
वर्णाश्रमधर्माच्या आश्रयानें आपलाले व्यवहार करावे. राज्याधिकारी
व राजकारणी आश्रित आहेत त्यांनीं अधिकारसंबंधें धर्माची स्थापना
करावी. त्याचे गुण. आज्ञा श्रीगोपालकृष्णकुलकृत. शके १७११
सौम्यनामसंवत्सरे, माघ शुध्द पंचमी.


लाभाचे गुण
कित्ता कित्ता
१ जमाखर्ची लिहिणार १ मुत्सदगिरी कारस्थानीं असावे.
१ स्वधर्माचे ठायीं विश्वास ठेवावा. १  मामलतींत शहाणे. 
१ पुत्रास शहाणें करावें.  १ धनीपणाचे गुण 
१ इंद्रियभ्रष्टाचा सहवास नसावा. .  १  उदमांत शहाणे 
१ मिष्ट भाषण करावें.  १ वतनामध्यें आचरण. 
१  वृध्दपरंपरेची मर्यादा रक्षावी. १  समाधानवृत्ति.  
 १ धन्याचे कामाची एकनिष्ठता  १  स्नानसंध्या षट्कर्मे  
 १ असावी. १ लोकापवादाचें भय.  
 १ न्यायी निष्ठुरता असावी. १ शरिरास जपावें.  
 १ कुटुंबास आज्ञेंत ठेवावें.  १  नाशकर्ते ओळखावें.  
 १ दुष्ट व्यवहारी ओळखावे. १  मनुष्याचा गौरव.  
 १ सत्पुरुषाचा सन्मान करावा.  १  स्वरूपज्ञान असावें. 
 १ पापद्रव्य मेळवूं नये..  १  सेवकवृत्तीनें धनी आर्जवावा 
 १ * शिष्टाशीं सख्य राखावें.  १  शरणांगताचें संरक्षण करावें  
 १ बंधूशीं अंतर देऊं नयें. १  शिक्षाप्रतिबंध सोसलेला असावा  
१ हिशेब मोसबवार लेख असावा. १  १ बंदोबस्ताच्या पध्दति.  
१ जाबसाली शहाणें.  १ सारासार विचार करावा.
१ परोत्कर्षाचें सहन.  १ वावगा खर्च करूं नये.

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries