सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सवडी [ समर्द्धि = सवडी, सवड ] मला सवड झालें म्हणजे = यदि मे समृद्धिः स्यात्.

सवंडी [ समर्द्धि = सवडी = सवड, सवंड ], competence सवडीनें कर्ज फेडूं म्हणजे समर्द्धि आली असतां कर्ज फेडूं.

सवत [ सपत्नी = सवत्ती = सवत ] (स. मं.)

सवता [ स्वायत्तः = सवता ( स्वतःच्या अधीन ) ] सवता सुभा म्हणजे स्वायत्त सुभा. स्वतंत्र पासून सतंत अपभ्रंश होतो.

सवतें-ता-ती [ स्वतंत्र = सवँत = सवत (ता-ती-तें) ] सचंतर असा हि अपभ्रंश सध्यां मराठीत होतो. सतंतर असें हि, रूप आढळतें व तें सचंतर हून प्राचीन आहे. ( भा. इ. १८३३ )

सवंदणी [ शुन्धनी ] ( सौंदणी पहा)

सवन [ स्वननं = सवन ] सवन म्हणजे गातांना स्वरावर जें स्वामित्व ठेवतात तें, स्वरस्वामित्व.

सवंय [ (पु.) समय (चाल, कायदा, संगति ) = सवंय ( स्त्री. ) ] (भा इ. १८३३)

सवरतो [ स्वरयति = सवरतो ] स्वर म्हणजे दोष काढणें
बोलतो सवरतो म्हणजे बोलतो आणि दोष काढतो. ( भा. इ. १८३५ )

सवशान [ शवशयनं = सवशान ( स्मशान ) ] हा शब्द गांवढे योजतात.

( झाडणें ) सँवाँरणें [ संमार्जन = सँवाँरअणँ = संवारणें = संवरणें ] ( भा. इ. १८३४)

सवाशीण, सवाष्ण १ [ संवासिनी ( a woman cohabiting with her husband ) = सवाशीण, सवाष्ण ]

-२ [ सुवासिनी = सवाष्ण ] (स. मं.)

सवें [ समता = सवआ = सवा; सवें सप्तमी एकवचन स्त्रीलिंग ] ( ज्ञा. अ. ९ )

संशयबिंशय [ संशयविशयः = संशयबिंशयः ] doubts and objections. सं च्या सादृश्यानें वि वर अनुस्वार.

संसार  [ संसारमार्गः योनिद्वारे ( त्रिकांड शेषः ) ] संसार म्हणजे योनि, असा अर्थ संस्कृतांत आहे, तो च महाराष्ट्रांत मराठींत परंपरेनें रूढ आहे. (भा. इ. १८३६ )

ससेमिरा - सिंहासनद्वाचिंशतिकेच्या द्वितीयकथेंत हीं चार अक्षरें आलीं आहेत. हीं चार अक्षरें चार श्लोकांचीं प्रथमाक्षरें आहेत. कृतदोषाबद्दल जी चिंता लागते तीस मराठींत ससेमिरा म्हणतात.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries