सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

भगास [ भग्नाशं = भगास ] सर्व जग भगास दिसूं लागलें.

भंगी [ भंगी (indirect hint) = भंगी ] श्लोकाची भंगी करणें म्हणजे पूर्ववक्ता जे श्लोक म्हणेल त्याचें अंत्य अक्षर किंवा शब्द यांनीं प्रारंभ होणारा श्लोक दुसर्‍या मनुष्यानें म्हणणें.

भंजन [ व्यंजन ( चटणी) = बंजन = भंजन ]

भजें [ भज् १० विश्राणने. भज् ( भाजयति) = भाजणें. भज्यं = भजें. भक्तः = भात ] ( धा. सा. श. )

भटार [ भ्रष्टकार किंवा भ्रष्टहार = भट्टार = भटार. भटार (प्रा.) + खानह् (फा.) = भटारखाना. भ्रस्ज् धातु ] (भा. इ. १८३३)

भट्टारक [ भर्तृ = भर्तार = भट्टार. भट्टार + क= भट्टारक ] संस्कृत नाटकांत नटी आपल्या नवर्‍याला म्हणजे भर्त्याला भट्टार या प्राकृत सन्मानदर्शक नांवानें संबोधते. तेव्हां भट्टार हा शब्द भर्तु या संस्कृत शब्दाचें प्राकृत रूप आहे. पुढें भट्टार हा शब्द जशाचा तसा पुन्हा संस्कृतांत घेतला. हा संस्कृतीकृत भट्टार, भट्टारक शब्द जुन्या ताम्रपटांतून राजांना अनेक स्थळीं लावलेला आढळतो. (भा. इ. १८३३)

भट्टिकाव्य [ भर्तृ - (हरि) - काव्य = भट्टिकाव्य. भर्तृ = भट्टि ] (भा. इ. १८३३)

भट्टी [ भृज् १ भर्जने, भृष्टिः = भट्टि = भट्टी ( कुंभार वगैरेंची) (भा. इ. १८३३)

भडक १ [बर्हक ( चमकणारे) = भडक ] लालभडक.

-२ [ भर्ग (उजेड, लखलखणारें तेज ) = भरग = भडग = भडक ] लालभडक = रक्तं भर्ग.

-३ [ अभ्यधिक ( अतिशयित, श्रेष्ठ ) = भडक ] लालभडक supremely red.

-४ [ अभ्यधिकं surpassing excellent = भडक ] exceedingly. लालभडक surpassingly red. Note - भडक विशेषणाच्या पुढें येतो. मागें येता तर विशेषण होता. येत नाहीं; सबब क्रियाविशेषण अव्यय.

भडभड १ [ भटभटाय ](धातुकोश-भडभड ३ पहा)

-२ [ भडि परिभाषणे. भडभड (द्विरुक्ति), भडभडून येणें, रडणें ] (ग्रंथमाला)

भडभडून १ [ भटभटाय ] ( धातुकोश-भडभड ३ पहा)

-२ [ भटभटायित्वा = भडभडून ] भडभड आवाज होऊन किंवा करून. (भा. इ. १८३६)

भडभड्या [ भट् १ परिभाषणे. भटभटकः = भडभड्या ] ( धा. सा. श. )

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries