सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

हें १ [ इति = इइ = ई= ही = हें ] अहं गच्छामि इति उक्त्वा = मी जातीं हे म्हणून; वयंगच्छामः इति उक्त्वा = आम्ही जातीं हें म्हणून; येथें इति व हें अव्ययें आहेत. (भा. इ.१८३४ )

-२ [ एतद्, इदम् व अदस् पासून तीन ह निघतात. पहिले दोन ह सन्निकृष्ट अर्थ दाखवितात व तिसरा ह विप्रकृष्ट अर्थ दाखवितो. प्रकृतस्थलीं सन्निकृष्टार्थक ह आहे. तेव्हां तो एतद् किंवा इदम् पासून निघालेला समजावा. हा, ही, हें.]  (ज्ञा. अ. ९ पृ. १)

हेकट [ इतिकथ (दुष्ट) = हेकट ]

हेंका, हेंकांडणे [ इदं-किमितिका = हेंका ] हेंका म्हणजे हें असें कां असा हट्ट धरणें. ( धा. सा. श. )

हें कां करणें [ इदं किमितिका ] to ask reason there of.

हेंगाडा १ [ इंगतानभिज्ञः = एंगाडा = हेंगाडा ]

-२ [ एककांड: ] (धातुकोश-हेंगाड २ पहा)

-३ [ इतिकथ deviating from the rules of his caste, lawless = हेंगाडा ] हेंगडी भाषा, कृति, जाति.

हेटकर [ हेतिकर = हेटिकर = हेटकर ] हेति म्हणजे कुर्‍हाड, परशु. (भा. इ. १८३४)

हेटकरी [ हेतिकराः = हेटकरी ] हेति म्हणजे फेकण्या हत्यार.

हेटाळणें [ हेडन = हेटाळणें.
यद्देवा देवहेडनं देवासश्चकृमा वयं।
(शुक्लयजुर्वेदसंहिता-अध्याय २०-कडिका १४) हेड असा मूळ धातु. त्याला आळ प्रत्यय लागून मराठी हेटाळ. ड् = ट् ] हेडनं म्हणजे अपराध. हेटाळणें म्हणजे अपराध करणें, उपमर्द करणें. (भा. इ. १८३७)

हेडा, हेड्या [ हिंडकः = हिडा = हेडा, हेड्या. हिंड् गतौ हिंडक = हिंडगा. ] गुरांचे कळप घेऊन हिंडणारे.

हेंदारें [ हिंडीर: a man, a male ] सैरावैरा चालणारा गचाळ मनुष्य. (ज्ञा. अ. ९ पृ. १४३)

हेदू [ हेमदुग्ध = हेदू ] वृक्षनाम.

हेर [ निशाचरो गूढनरो हेरिकः प्रणिधि श्च सः ॥ १६८ ॥
धनंजयकोश. हेरः एव हेरिकः ॥ ] (भा. इ. १८३३)

हेल, हेलकरी [ हेलः = हेल ] हेल म्हणजे लग्न समारंभाच्या वेळीं पाणी वगैरे घालून मजा, करमणूक करणे. हेलकरी म्हणजे अशी करमणूक करणारी माणसें. त्यावरून दुसरा अर्थ ओझेवाला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries