भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

१०. भारतीय आर्यात विवाह अग्नीच्या सामक्ष्याने कां व्हावा लागतो ते वरील तपशिलावरून स्पष्ट होते. कोणत्याही समाजातील विवाहाचे मुख्य प्रयोजन जे प्रजोत्पादन ते रानटी ऋषिपूर्वज आगटीभोंवतील यज्ञकुंडावर म्हणजे जमातीच्या जागी करत. सबब त्यांचे वंशज जे वैदिक व सद्यःकालीन भारतवर्षीय आर्य तेही आपले विवाह तातस्य कूपं या न्यायाने अग्नीसमक्ष करतात.

परिशिष्ट
(कृष्णयजुः संहिता, कांड ७, प्रपाठक ४, अनुवाक १९)
(१) अंबे अंबाल्यंबिके न मा नयति कश्चन । हे अंबे, हे अंबालि, हे अंबिके, मला कोणीही नेत नाही.
टीका :- या मंत्राचे तीन पाठभेद आहेत. एक पाठ कृष्णयजुः संहितेतील, दुसरा पाठ यजुः सहितेतील व तिसरा पाठ पाणीनीय अष्टाध्यायीतील.
यातील कृष्णपाठ-अंबे अंबाल्यंबिके
शुक्लपाठ-अंबे अंबिकेऽबालिके
पाणिनिपाठ-अंबे अंबाले अंबिके

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries