[ १२३ ]                                      ।। श्री ।।              २२ फेब्रुवारी १७५८.

तालीक

राजश्री१७७ कमावीसदार वर्तमान व भावी प॥ इटावे प्रांत अंतरवेद गोसावी यांसिः-
स्नेहांकित रघुनाथ बाजीराऊ नमस्कार व आशीर्वाद. सु।।समान खमसैन मय्याअल्लफ. वे।। हर गोविंद विश्वनाथ बिन पेमनाथ ब्राह्मण कानकुडष यांणी हुजूर कसबें लाहोरचे मुक्कामीं येऊन विदित केलें कीं “पातशाही बेगम यांणी मौजें कनकपूर प॥ मजकूर येथील सायेरपैकी रोज चार आणे करून दिल्हे होते. याप्रमाणें चालिलें. सरकारचा अंमल जाहालियापासून रोज चालत नाहीं. तरी सुदामंतप्रमाणें करार करून घ्यावा ह्मणोन”. त्याजवरून हे सनद सादर केली असे. तरी मौजे मजकूरचे सायेरपैकी पातशाही बेगम यांणीं दिल्याप्रमाणें च्यार आणे दररोज करार केले असेत. तरी मोगलाई अमलांत रोज चालत आलियाचा भोगवटा मनास आणून त्याप्रमाणें चालवणें. मोगलाई अमलांत चालत आलें असेल तें बंद न करणें. चालत नसेल तें न चालवणें. प्रतिवर्षी नवीन आक्षेप न करणें. या सनदेची नक्कल घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतोन देणें. जाणिजे. छ १३ साबान. आज्ञा प्रमाण. मोर्तब सुधा शिक्का आहे. वार ही आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries