मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १४९

श्री.
१६९६ भाद्रपद वद्य ६

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारोपंत नाना स्वामीचे शेवेसी:-

पोष्य बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ १९ रजब पावेतों यथास्थित असे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें ते पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. राजश्री दीपाजीराव येरूणकर यांनीं आह्मांस जुने लोकांचें बोलणें ऐकून, मजकूर लिहिला. त्याजवरून आपल्यास येविशीचा मजकूर काल लिहून पाठविलाच आहे. तरी, तुह्मीं येविशींचा मजकूर ध्यानात आणून बंदोबस्त करावा, ह्मणोन लिहिलें, त्यांनी लिहिल्यावरूनच लिहिलें आहे. दुसरा प्रकार कांहींच नाहीं. नामजाद लोकांचा भरणा किल्यावर बराच आहे. आपण जाऊन बंदोबस्त केला. उत्तम आहे. आपल्या लिहिल्यावरून खातरजमा जाली. नाहींतर दिपाजीरायांचे लिहिल्यावरून संशयांत पडलों होतों. गुंता उरकला. येविशीं दीपाजीरायास लिहितों. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries