मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १५८

श्री.
१६९६ फाल्गुन शुद्ध १३

सेवेसी जनार्दन आपाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. फिंगोंजी व भवानी वोतुरकर सिंपी वस्ती पेठ पुरंधर हे पुरंधरास अटकेस होते, त्यांस पुण्यास पाठविले आहेत, तरी या दोघांचा शिरच्छेद करून लिहून पाठवणें ह्मणोन स्वामचे पत्रीं आज्ञा, त्यास, आज्ञेप्रमाणें फिंर्गोजी व भवानी शिंपी यांचा शिरच्छेद केला. रा छ ११ मोहरम सुा खमको सबैन मया व अलफ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries