मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १६६

श्री माहालक्षुमी. १६९७ मार्गशीर्ष शुद्ध २
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके १०२ मन्मथ ना

म संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति स्वामी याणीं वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदासिव-दीक्षित ठकार यांसि आज्ञा केली ऐसीजे, तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें. हुजूर प्रविष्ट जाहलें. आपण श्रीचे दर्शनास करवीरास येणार, येविसीं आज्ञापत्र सादर व्हावें, म्हणून विनंतिपत्रीं लिहिलें, तें विदित जालें. श्रीचे दर्शनास हर कोण्यास येणेविसीं लडा काये आहे ? तुह्मी येणार, तरी सुखरूप येऊन, श्रीचें दर्शन घेऊन, जाणे. जाणिजे. निदेश समक्षे.

समत मंत्री.
बार सुरु सुद
समत सुद बार.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries