मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७०

श्री
१७२४ वैशाख अखेर

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत तात्या स्वामीचे सेवेसीः-

सेवक लक्षुमण उमाजी मुा। सोलेगांव रामराम विनंती उपरी तुझी महादूबराबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर कळला. लष्करचें वर्तमानं तर: बंगस याचा मु। मौजे काठीपिंपळगांवावर होता, अशी बातमी होती. परंतु, सतेमिथे हें कांही पुरतें कळलें नाहीं. दुसरें श्रीमंत येशवंतराव होळकर याचा मुकाम पुनतांब्यावरच आहे. त्याचा रोख वैजापूरचा दिसतो. ऐसें पत्र मेसीभालगांवचे सोलेगांवकरी यांसी आलें, मेसीपासून खंडणी बागसानें रु।

तीनसें घेतली. परंतु मोंगलाई गांवचाही धीर.......भामगांवास आले. को सेंदूरवदें हेंही पळतें. ऐसें वर्तमान आहे. आह्मी बुधवारीं कायगांवास जाऊं. आपले गांवचे दरोबस्त गुढेंगांवाकडे गेलें. आपणास कळावें, इ. इ.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries