मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६५.

श्री.
१६९२

सेवेसीं विज्ञापना. कोंकणचें वर्तमान तरी तुळाजी आंग-याचे लेक दोघाजण परांगदा होऊन सिहीगडास गेले होते. ते हालीं विजेदुर्गावर येणार ऐशी बातमी विजेदुर्गाहून आली आहे. विजेदुर्गाचे आरमाराशीं लढाई जाहली, ऐसेंहि बोलतात. त्याजपाशीं आरमारहि फार आहे. दाहा हजार फौज आहे. इंग्रज सामील आहे. व समागमें हैदरअल्लीचीहि फौज आहे. राजश्री विसाजीपंत सुभेदार काल एकादशीस रात्रीस मुहुर्तानें पुणेंयास गेले. राजश्री बाबुराव राजवाडे गांवाची फारच चौकशी करीत आहे ज्या गांवाची एकदां पाहाणी जाहली व चौकशी जाहली. त्या गांवची आतां चौकशी होत आहे. सेवेसी कळावें ह्मणोन लिहिलें आहे. राजश्री विसाजीपंत सुभेदार यांजपाशीं येथें हरएक कामकाज पुसिलें तरी ह्मणत कीं त्रिंबकपंतांस दूर करावें. मग पूर्ववत प्रों आबाचा आमचा घरोबा आहे त्याप्रों चालों. सेवेसी कळावें ह्मणोन लिा आहे. श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries