मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८७

श्री.
१६९५ माघ वद्य ४ वद्य ३०

पु। सेवेसी सां। नमस्कार. विनंति. येथील वर्तमानः श्रीमंत उभयता * * बाई पुरंधरास गेली. राजश्री नाना फडणीस व राजश्री सखारामपंत बापू व हरीपंत फडके ऐसे त्रिवर्ग तेथें आहेत. राजश्री मोरोबादादा फडणीस पुणेयांत आपल्या बागांत राहिले आहेत. काम कारभार सर्व बाईच्या नांवें पत्रे होतात, सरकारी कारखाने पुरंधरास नेतात. लोकहि सावध जाले आहेत. जिकडे ज्यांचा थारा तिकडे ते थारियास लावितात. ऐशास, राजश्री तात्यास घरास पाठवावें ह्मणोन दोन तीन पत्रांनीं लिहिलें आहे. त्यास, आपण लिा कीं, काका त्रिंबकराव मामाच्या लष्करीं गेले आहेत, ते आले ह्मणजे तात्यास लौकर पाठवितों, ह्मणोन लिहिले. तरी, तात्यांच्या येण्यास बहुत दिवस लागतील. तरी च्यार उंटें, दोन तट्टें सत्वर पाठवावीं. दोन उंटें राजश्री रावजीस दिलीं पाहिजेत. यास्तव उंटें, तट्टें जरूर आधीं पाठवावीं. दिवसगत न करावी. कृपा किजे. हे विनंति. इ० इ० इ०

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries