लेखांक ४६.
श्री.
श्रीमत् परमहौंस श्रीपांडुरंगाश्रम स्वामींचे सेवेसी-

सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. विशेष मौजे केळगांव पा चाकण हा गांव आम्हांकडे आहे, त्यास मिरासपट्टीचा तगादा लागला आहे, तो मना करावा, म्हणोन लिहिले ते कळले. ऐसियास, मौजेमजकुरास यामागे मिरासपट्टीचा तगादा लागला नसेल तर हालीही तगादा लागणार नाही. येविसी परभारे सुभ्यास पत्र सादर केले आहे. कळले पाहिजे. * बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.


लेखांक ४७.
श्री.
श्रीमत् परमहौंस श्रीपांडुरंगाश्रम स्वामीचे सेवेसी-

सेवक चिमणाजी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल श्रीकृपे यथास्थित असे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविले ते पावले. मौजे केळे या गांवावरी मिरासट्टीचा तगादा जाहला आहे तो मना करावा, म्हणून लिहिले. त्यास स्वामीचे आज्ञेप्रमाणे वरातदारांस मनारोखा पाठविला आहे. गांवास तगादा करणार नाहीत. कळले पाहिजे  * हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries