मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १९४.


१७०० मार्गशीर्ष शुद्ध १२.

राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तळ्याजवळ पंचमुखी माहादेव त्यापासी त्याच देवळांत भवानी आहे. तीस नथ करोन द्यावयाचा मानस आहे. तरी, तुह्मीं तेथें जाऊन चिठ्या घालाव्या कीं नथ करावी किंवा न करावी. करावी ऐसी आली, तरी मोतें, माणिक, मणी व सोनें सुद्धां, (श्रीवरळेश्वर येथील भवानीस नथ पेशजी करून दिल्ही आहे. रुपये चोवीस हालीं) हे देवीस त्याप्रों दोन अधिक अथवा दोन उणे लागले तरी नथ करून देवीच्या नाकांत घालणें. तुह्मांकडील त॥च्या ऐवजी मजुरा पडतील. जाणिजे. छ ११ जिलकाद.

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries