मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसर्वेश्वर.

लेखांक ३१०. 

१७१४ ज्येष्ठ शुद्ध १०.

पौ जेष्ट शु॥ त्रयोदशी शके १७१४ परिधावी संवत्सरे

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्र्यंबक रावजी स्वामीचे शेवेसी:-
सेवक मोरो त्र्यंबक गोडबोले साष्टांग नमस्कार विनंति विशेष. तिर्थरूप बाबांस वैशाख वद्य एकादशीस देवाज्ञा जाली. हें वर्तमान मजला ब्राह्मणवाडे येथें समजलें. उपरांत घरीं आलों. कळावें. ईश्वरसत्ता प्रमाण. त्यांचे सर्व प्रकारें बरें जालें. आपलें छत्र गेलें. असो. तुम्हीं आपणाकडील सर्व वर्तमान लिहीत जावें. राजेश्री त्र्यंबकराव परचुरे यांस सा॥ नमस्कार सांगावे. र॥ मिती जेष्ट शुद्ध १० गुरुवार. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.

सेवेसी रामाजी केशव पळनिटकर सा॥ नमस्कार विनंति लिहिली परिसोन सदैव पत्रीं संतोषवीत असावे. या योगें स्नेह जाहाला यास अंतर नसावें. बहुत काय लिहावें ? कृपा लोभ करावा हे विनंति. सेवेसी चिंतो रामचंद्र पळनिटकर कृतानेक सा।। विनंति लिहिलीं परसोन कृपेंत अंतर नसावें. भेट होईल तो सुदिन. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries