मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीपांडुरंग.

लेखांक ३२१.

१७२० आषाढ वद्य १२.

पो।। छ २४ शवाल

सुहूर सन तिसा तिसैन मया व अलफ.
श्रीमंत राजश्री रावसाहेब साहेबाचे सेवेसी. आज्ञाधारक तुकोजी लकोबा व बाळासाबत कृतानेक दंडवत विज्ञापना त॥ छ २९ मोहरमपावेतों साहेबाचे कृपावलोकन करून सु॥ नागपूर येथें शेवकाचा वर्तमाण यथास्थित असे. यानंतर राजश्री सेनासाहेब सुभा याजकडील वर्तमान छ ४ राजपावेतो साहेबाचे सेवेसी लिहिले च आहे. यानंतर छ ५ रोजी नागपुरापासोन चवकोसावर कापसी ह्मणून गांव आहे तेथें मु॥ होता. तिसरे प्रहरीं आपण व कृष्णराव व माधव श्रीधर लक्षुमण ऐसे बोलत बसले होते. साहा घटका दिवस राहाता आपल्याकडील वकील गढे मडम्याकडे जाववयाकरितां राजनी आपाजी रघुनाथ यास रवानकीचे विडे दिले. व बराबर स्वार पंचवीस देववायाची नेमणूक जाली. नंतर सायंकाळी सईनासाहेब व परसोजी भोसले याचे कुटुंब नागपुरास रवाना केले. साहेबास कळावें. मग आपण व कारभारी बसून तेथून आठा कोसावर माथनी मोहोन प्रगाना नजरइन प्रांत रामटेकचा मुकाम नेला. साहेबास कळावें. छ ६ रोजी कुच करोन मुकाममजकुरी दाखल जाले. सायंकाळी पुण्याकडोन डाकची पत्रें आली नंतर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून साहा घटका खलबत जालें. साहेबास कळावें. छ ७ रोजी मु॥ जाला. गुज्याबा गुजर याजकडे गांव आहे, त्यांनी मेजमानी केली. तिसरे प्रहरी विठ्ठल बल्लाळ सुभेदार व रघुनाथराव घाटग यांस पत्रें लेहून सांडणीस्वार रवाना केले. साहेबास कळावें. साहेकाळी येसुभाई सिलेदार याचा घोडा बोर बहुत चांगला होता तो आणून सरकारांत लाविला. साहा घटका रात्रीस कारभारी आले. यावर आपण व भवानी कृष्ण व उभयता कारभारी ऐसे बसून च्यार घटका बोलनें जालें. यावर भवानी कृष्ण याचा जावयास फार सखा आहे ह्मणून ते निरोप घेऊन घरास आले. साहेबास कळावें. छ ८ रोजी मु॥च होता च्यार घटका दिवस येता कटकाहून फिरंगियाची पत्रें व किष्णमराज याजकडील पत्रें आलीं होती. मग कारभारी बोलाऊन पत्र वाचून च्यार घटका खलबत जालें. दोप्रहर स्वारी तयार करून आपण व सईनाधुरंधर व परसोजी भोसले व उभयेता कारभारी ऐसे जाऊन सबदागराचे उंट सुमारी १७२ आले होते ते जाऊन खरीद केले. पु रु।। २५००० याचे वीस हजार त्यांत बटा कापला दर सेकडा रु।। पंधरा. याप्रमाणें बटा वजा करून सवदागरास वीस रु।। खर्चास देविले. आन रुपयाचा वाईदा आठा महिन्याचा केला. साहेबास कळावें. चंवऱ्यागडावर राजश्री बगाजीपंत भातवने व राघोपंत चीटणीस होते. त्यास राघोपंतास किलेदाराने सोडून दिले. याचें व याचें बोलनें लागलें. येसोबा याजपासी आहे. साहेबास कळावें. पांचा घटका रात्रीस कारभारी आलें. यावर कचेरीच्या डेऱ्यांत आपण व कारभारी आनंदराव वैद्य याचे कारकून पुण्याकडोन खंडोपंत आला होता, त्यास निरोपाची वस्त्रे सेला पागुटें पैठणी व मंदीली येक व किनखाबाचे ठाण अर्ध येकूण साडे तीन सनगें दिल्ही नंतर आपण व कारभारी बसून तेथून दाहा कोसावर क॥भडार ह्मणून गांव आहे तेथील मु॥ नेमून दरबार बरकास जाला. छ ९ रोजी प्रहर दिवस येतां कुच जालें. पुढें एका कोसावर आले तों पुन्याकडोन डाकची पत्रें आलीं. यावर आपण व सईनाधुरंधर ऐसे एका अंबारीत बसून पत्रें वाचीत मुकामा पावेतों आले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries