मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३७३.

तीर्थस्वरूप राजश्री तात्या स्वामीचे सेवेसी :-
अपत्य रघुपतराव याचे कृतानेक सां।। नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. रो।। बाबूराव अनंत आले. सर्व वर्तमान निवेदन केले. इकडील वर्तमान पत्रावरून ध्यानास येईल. सारांष येथील बंदोबस्ताविशई श्रीमंत बापूस विनंती करून आपण येथील बंदोबस्त करावा. येथील बंदोबस्ताविशईं श्रीमंत बापूस विनंती करून आपण येथील बंदोबस्त करावा. येथील वर्तणूक आपले आज्ञेविरहित नाहीं. दरबारसंमंधी ठराव करून बंदोबस्त करावा. आपण तेथील फडशा करितील त्या अन्वयें निभावणी होईल. आतां आपण संवशय न धरावा येथील लक्ष आपल्या पायांसी अथपर दुसरें नाहीं. आपण उपेक्षा केल्यास परिणाम नाहीं. सर्व भरवसा आपला आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती. माहालचे प्रगणियाचे वर्तमान रो।। राजाराम सांगितले  X X X X .

(पुढील बंद गहाळ)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries