मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ४३.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक शंकराजी सखदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ ९ माहे मोहरम जाणून स्वानंद-लेखन-आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनी कृपा करून छ २६ जिलकादचें पत्र पाठविलें तें पावलें. शिरसा वंदून सनाथ जालों. इकडील वृत्त पेशजी छ १९ व छ २१ जिल्हेजचीं विनंतिपत्रें पाठविलीं आहेत ते पावून सविस्तर श्रुत जालेंच असेल. हालीं वर्तमान बारीक मोठें आमचे यजमानाही विनंति लिहिली आहे त्याजवरून ध्यानारूढ होईल. येथील देणें राजश्री पुरुषोत्तमपंत नाना यांचे हातचें याचा प्रकार पूर्वी दोन च्यार वेळां विनंति लिहिली होतीच. राजश्री देवराव- तात्यास राजश्री गोविंदरावांनीं लिहिलेंच आहे. त्यास तेंच पत्र बजिन्नस आपणास दाखवितील किंवा विनंति करितील, त्याजवरून श्रुत होईल. कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries