मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                                               पत्रांक ९७.

१७६८ ता. २९ एप्रिल.                                                          श्री.                                                      १६९० वैशाख शुद्ध १३

चिरंजीव राजश्री राव यांसः—
रघुनाथ बाजीराव आसीर्वाद. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. अनूबाई कुलकर्णी मौजे सिनवली तो घोडें पो जुन्नर इनें अवगत केलें की “आपले सासरे त्रिंबक कृष्ण व चुलत सासरे नानाजी कृष्ण, या उभयतांचे मौजे मजकूरचें कुलकर्ण निमेनीम आहे. त्यास नानाजी कुलकर्णी मखमल अलमाचे (?) कैदेंत पडल्यावरी त्रिंबक कुलकर्णी यांणीं मोरो गोपाळ गोळे यांचे तिनसे स्त्रो कर्ज घेऊन नानाजी कुलकर्णी यास सोडून आणिलें. त्यापैकीं गोळ्यांस दोनसे स्त्रो कमज्यादा दिल्हे. बाकी शंभर रुपये अजमासें देणें राहिले आहेत. त्यास गोळ्यांनीं व्याजाचे व्याज करून शंभर रुपयांचे पंधरासे रुपये केले आहेत; आणि नानाजी कुलकर्णी याच्या पुत्रास नेऊन मौजे मारचें कुलकर्ण कर्जात लेहून घेतलें आहे. ऐशास नानाजी कुलकर्णी याचे लेकानीं आपले वाटणीचें द्यावें. माझे वाटणीचें कुलकर्ण द्यावयास अधिकार नाहीं व आपल्यावरी बहुताचें कर्ज आहे. त्यास सर्वास दामाशाईप्रों ऐवज वतनाचे विक्रयाचा येईल तो घेऊन फडशा करावा व मी जीवंत आहें तों माझे अन्नवस्राची बेगमी करून वतन घेणें तरी घ्यावें. ते न करितां वतन जबरदस्तीने घेतलें. त्याजमुळें दुसरे कर्जदार तगादे करितात व पोटास अन्नवस्र नाहीं; याजकरितां माझा वांटा कुलकर्णाचा मजकडे चालता करून कागदपत्र लेहून घेतले आहेत ते माघारे देवावे." म्हणोन. त्याजवरून हें पत्र आपल्यास लिहिलें असे. तरी सदरहू वर्तमान वाजबीचे रीतीनें मनास आणऊन विल्हीं लावावें. रा। छ ११ जिल्हेज, बहुत काय लिहिणे ? हे आसीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries