मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                 पत्रांक ३९. 

इ. स. १७६७ ता. ८ जुलई.                                                 श्री.                                                            आषाढ शुद्ध १२ शके १६८९

राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यासिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। माहादजी सिंदे दंडवत. विनंति उपरी. एथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. अलीकडे आपणाकडून पत्र एऊन वर्तमान कळत नाहीं त्यास सविस्तर अर्थ लिहित जाणे. श्रीमंत रावसाहेब देशास आले. त्यांची आपली भेट जाहाली असल्यास सविस्तर वर्तमान लिहून पाठवावें. येथील वर्तमान तपसीलदार कारभाराचें वगैरे राजश्री बाळाजीपंत यांनीं आपणास लिहिलें आहे त्याजवरून कळेल. सारांष जातेसमयीं आपण आह्मांस सांगितले कीं वरीसभरपर्यंत स्वहित किंवा अनहित मनास न आणावें त्याजप्रों आपले वचनाचें दृढतर धरून त्याअन्वय आहों. दुसरा मजकूर मातुश्रीबाईकडून पत्रें आलीं. त्यांत मजकूर कीं ‘घरीं पंचवीस हजार रुपये खर्च काढून भक्षिले. त्यास कर्जदार ऐवजाची निकड करितात याची तरतूद करून पाठवावें म्हणोन’ त्यास आह्मापाशीं ऐवज आहे किंवा नाहीं आणि येथें तरतूद होती अथवा नाहीं, हा अर्थ सर्व आपणास ठावकाच आहे. याजकारितां हें आपणास लिहिले आहे. तरी आपण पंचवीस हजार रुपये कर्ज मातुश्रीस देवावें. आह्मीं व्याजासुद्धां ऐवज सांगाल तेथें पावते करूं. मुख्य आपणास लिहिल्यावरून ऐवज पावेल हा भरंवसा जाणून लिहिलें आहे; तरी लिहिल्याप्रों कार्य करून उत्तर पाठवावें. वरकड सर्व गोष्टी आपण बोलले आहेत त्याजवरी कायम आहोंत कळावें. रा। छ ११ सफर *मातुश्रीस राहाण्यास जागा पेडगांव द्यावें म्हणून करार होता. परंतु अद्यापीवर तें काम जालें कीं न जालें हें लि।। नाहीं. तर कार्य करून द्यावें म्हनजे कोडथाहून तेथें राहतील. याजकारितां लि। आहे तर हें काम करून द्यावें. परस्थळीं बहुत दिवस राहावें हें विहित न (नै ? ). बहुत काय लि।। हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries