मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                 पत्रांक ६०. 

स. १७६७ ता. १६ दिसेंबर                                                  श्री.                                                मार्गशीर्ष वद्य ११ शके १६८९

श्रीमंत् राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसीः—
विनंति सेवक माहादजी सिंदे दंडवत विज्ञापना तागाईत छ २४ रजब पावेतों मुक्काम बराणपूर येथें स्वामीच्या कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. आम्हांस हुजूर येणेविशीं पांचसात पत्रें आलीं कीं, तुम्हीं भेटीस येणे. तुमच्या लक्षानें सरदारीचा बंदोबस्त करून देऊन तुमची रवानगी हिंदुस्तानांत करावी लागती त्यास तुम्हीं लौकर येणें. त्यांजवरून येथील निर्गत कळेल तैशी कर्जवाम करून मजलदरमजल मुक्काम मजकुरास दाखल जाहालों, तों पुण्याहून बातमी आली त्यांत मजकूर कीं स्वामीनीं बाजीनरशी व राघोराम यांस उभें करून नजर दहा लक्ष रुपये करार केले. त्याजपैकीं पांच तुर्त द्यावे व पांच निशा द्यावी. याजप्रमाणें करार करून सरदारीचीं वस्त्रें आमचें नांवें दिल्हीं. आमचें पत्र दाहा रोजाच्या मित्तीचें स्वामीस समजाऊन त्यांनी हा कारभार केला आणि खावंदानी–ही कृपा करून सांगितला. त्यास आमचा उजूर काय ? सारांष. खावंदानीं दौलत दुसरियाच्या जिम्मा केल्यासही आमचा गुंता नाहीं, परंतु आम्हीं खावंदाच्या आज्ञे प्रों येत असतां हा मजकुर न घडावा. *सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना. सेवेशी त्रिवर्ग बराबर येत असो श्रुत व्हावे हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries