मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                                        पेशवे प्रकरण.

या प्रकरणांतील कांहीं पत्रे फारच महत्वाचीं आहेत. केंदूर गायकवाडांस दिलें ह्यांत राघोबादादांची धूर्तता दिसून येते. पर्वतीसंस्थानच्या खर्चाची व्यवस्था स्मरणीय आहे. चिंतो विठ्ठल रायरीकर हे फडनीशीचें काम बघत म्हणून त्यांच्या संग्रहांत ह्या पर्वतीच्या सनदा सांपडतात. पत्रांक ७९ मध्यें मल्हारराव होळकरांसंबंधें झालेले रावसाहेब माधवराव यांचे मत स्पष्ट दिसत आहे. १७६४ च्या मे महिन्यांत दादासाहेबांनीं राज्याची उठाठेव करण्यास सुरवात केली. याचवेळीं मोरो नरहर नांवाच्या मनुष्यावर आरोप आणणें, ( पहा पत्रांक ८१) पुरंदर किल्ला कोव्यांनी घेतला तो रावसाहेब पेशव्यांच्या फुसलावणीनें घेतला अशा कंड्या पिकविणे, ठाण्याची आदलाबदल करूं देत नाहीं म्हणून दादांनी तट्ट फुगून बसणे इत्यादि आनंदीबाईच्या अघोर आगलावीपणाचे चाळे सुरू झाले. ८१-८३ पत्रांकवरून चिंतोपंतांची रावसाहेबांनी कशी कान उघाडणी केली आहे व परोक्षतः दादासाहेबांस किती छान उपदेश केला आहे हे समजून येतें. पत्रांक ८५ मध्यें दादासाहेबांची भोळसर कुटिलता दृग्गोचर होते. पत्रांक ८७, ८८ व ८९ हीं रावसाहेबांची देशाभिमानी नम्रता कशी उज्वळ होती, याची साक्ष देतात. बाकीचीं पत्रें न्याय, नेमणुकासंबंधांचीं आहेत. मुख्य गोष्ट ही कीं, रावसाहेबांविरुद्ध आमच्या बाइलबुद्धि दादासाहेबांनीं नांहीं नाहीं ती बालंटें आणली आणि त्या बिचा-या सात्विक व सत्वशील राजबिंड्याच्या पाठीमागें हरणकाळजीचा घातक ससेमिरा लाविला; ही महत्वाचीं गोष्ट रायरीकरांच्या पत्रांवरून सिद्ध होते. नारायणरावाचा साक्षात् खून करणाच्या आनंदीबाईने माधवरावास परोक्षतः क्षयरोगी केलें असे कोणी विधान केलेंच तर तें सत्यापासून फारसे दूर असणार नाहीं.



                                                                                               पत्रांक ७५.

स. १७६३ दिसेंबर आरंभ                                                     श्री                                                               १६८५ कार्तिक अखेर

केंदूर दमाजी गायकवाड याजकडे दरोबस्त द्यावें. त्याचे ऐवजीं मौजे मजकूरचा आकार अदमासें सात हजार व कित्ता दरसाल रुपये दहा हजार एकूण सतरा हजार रुपये-याचा सरंजाम श्रीमंताकडे रेवातीरीं द्यावा. विद्यमान खासा मशारनिले. हस्ताक्षर रामचंद्र यसवंत सन अर्बा सितैन कार्तिक अखेर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries