मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

                                                                                         लेखांक ११.                                                 
१७०१ मार्गशीर्ष शु॥ ७.                                                   श्री.                                                    १५ डिसेंबर १७०९.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेषः- तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. नवाब हैदरअलीखान बहादूर यांचे पुत्र करीमखान यांचें लग्न छ २५ जिल्कादीं करावयाचा निश्चय होऊन, सरकारांत व आपल्यास व राजश्री महादजी सिंदे यांस वगैरे कुंकुमपत्रे पाठविलीं आहेत. याजकरितां त्यांस बहुमान आहेर पाठवावयाचा मजकूर व अदवानीचे मजकुराविसीं नरसिंगराव यांजपासून पत्र नवाबबहादर यांस पत्र पाठविलें होतें त्याचें उत्तर आलें त्याचा मजकूर, राजश्री गोविंद नारायण यांचे पत्रावरून कळेल, ह्मणोन लिहिलें तें कळलें. व गोविंद नारायण यांचें पत्रावरून अदवानीचा महसरा उठऊन नवाबबहादर नेण्हार, तो अर्थ समजला. ऐशांस नवाबबहादर यांजकडे शादी होणार हें श्रवण होऊन संतोष जाला. मागाहून यथापद्धत बहुमान आहेर र॥ होईल. नवाब निजामअलीखान यांचा व सरकारचा स्नेह जाणोन, अदवानीचा महसरा नवाबबहादर उठऊन नेण्हार उचित आहे. लौकर फौज उठऊन नेऊन, चेनापट्टणाकडे योजिल्या मसलतीस र॥ करीत, तें नरसिंगराव यांस सांगोन आधीं करवावें. नवाब निजामअलीखान बहादर यांची फौज कृष्णेपर्यंत गेली. लौकरच अदवानीस जाऊन ते आपला तेथील बंदोबस्त करितील. महसरा अदवानीचा लौकरच उठऊन नेत, असें आधीं करवावें. र॥ छ ६ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति. पै॥ छ १८ जिल्हेज. मार्गेश्वर मास, स॥ समानीन. मुक्काम नेगळूर प्रां॥ सावनूर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries