मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

                                                                          लेखांक १६१.                                                            
१७०२ ज्येष्ठ व॥ ६.                                                      श्री.                                                                 २३ जून १७८०.                                                                               

आंसाहेबाकडून खत फरहतनमत आलें तें बवख्त नेक पोंहचून खुशी हासल जहाली. तमाम मरातबाहून आपला येखलास मंजूर आहे. याजकरितां छ २४ जमादिलावलीं नेकसात पाहून डेरेदाखल जालों. एका दों रोजांत कृष्णराव नारायण यांची रवानगी करून दरकूच आह्मी जात असों. खुदाचे फजलेनें इतकियावर इंग्रजांची तंबी होईल. ती जहुरांत येईल. कडप्याहून मिरजा अली रजाखां याणीं इकडील लिहिल्याप्रों। इंग्रजांचे तालुकियांत जाऊन मुलुक तख्त व ताराज केला. यासिवाय तालचरीसही महसरा करविला आहे. बिलफैल परशरामपंत कोल्हापूर जिल्ह्यास येऊन चिलर कामावर अटकून राहिले आहेत. यांस फौजसह सिंदे यांचे कुमकेस रवाना करावे. हें ऐन सलाह ह्मणोन कलमीं केले. त्याजवरून हार्फषहार्फ दिलनिशीन जाले. चुनाचे आंमेहरबांस दोस्तीची एहतीमात मंजूर रोजबरोज तरकी व्हावी. हें दिलापासोन खाहेष. याचा तपसिल आजी जुलकद्र कृष्णराव नारायण हामेश कलमी करितात. त्यास दोस्तीचे अलमात हेच लाजम आहे. इकडीलही हेच खाहेष कीं, तरफैन येखलास व येक सुईची तरकी ज्यादा होत असावी. आंसाहेब नेकसातेस खेमेदाखल जाले. हे ज्याहायेतबंज्या व मसलतीस मुनासब. आईंदे कूचदरकूच कुल्हापोशाचे तालुकियांत नमूद होऊन तंबीवालाई अमलांत यावी. आंमेहरबाही आजम जलद केल्यास इंग्रजांची तंबी खातरखा होईल, हा दोस्तदारास नक्ष आहे. मिरअली रजाखान याणीं हंगामा त्याचे तालुकियांत केला हे गोष्ट बहुत नेक आहे. गुजराथचे जिल्ह्यांत मातबर फौजेनसीं सरदार यांणीं जाऊन इंग्रजांस अजीज व बतंग केले. कोंकणप्रांतांत हालीं ममईकर यांणीं शेखी केली त्याचे गोषमालिस सरकारांतून हुजूरचे फौज के गाडद रवाना जाली व होत आहे. परशरामपंत यांस बिलफैल इंग्रजांचे तंबी करतां आणवावें ऐसी हाजत नाहीं. मशारनिले याजकडून आंसाहेबाचे तालुकियास सेरमो इजा जाली नाहीं, व आईंदे व्हावयाची नाहीं. कितूरकर व कोल्हापूरकर याणीं बेअदबी केली. त्यांचे तंबीस रवाना जाले. त्यास, कितूरकर याचे खंडणीचा व तालुकियाचा जाबसाल होत आहे. बाद फौजा छावणीस येतील. येविशीं कितेक मरातब कृष्णराव नारायण यांस कलमीं केले आहेत. ते बयान करतील. हमेशा खत पाठवून आपले खैरीयतची इतला होत असावी. ह्मणोन हैदरअलीखाबहादूर यांस पत्र.

नाना फडणीस यांचे नांवें सदरहूप्रों। उत्तर र॥ केलें छ १७.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries