मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

पै।। छ २१ जिल्हेज.                                                        लेखांक २२.                                            १७०१ मार्गशीर्ष व॥ ७.     
सन समानीन, मुक्काम पट्टण.                                       श्री.                                                     २९ दिसेंबर १७७९.
                                                                                       
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नरसिंगराव स्वामींचे सेवेसीं:-
पो।। कृष्णराव बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- आपण जाऊन पट्टणास पावल्याचें पत्र आलें नाहीं. त्यास, सविस्तर ल्याहावें. अदवानीचा महसरा आधीं उठवावा, हें जातेसमईं सांगितलें; व नवाबबहादूर यांस पत्रेंही मदारुलमही यांचीं व आमची पाठविलीं. त्यांचें उत्तर नवाबबहादूर यांचें तुह्मांस आलें कीं, हांगामा मना करवितों. ऐसें असतां, हा वेळपावतों हांगामा मना जाला नाहीं. दिवसेंदिवस अधिकच उपद्रव होतो. याजमुळें नवाबांची मर्जी नाखुष आहे. इंग्रजाचे मसलतीचे शरीक, व सरकारचा त्यांचा स्नेह कोणे प्रकारचा आहे, हें सर्व माहीतगिरी. इंग्रजाची मसलत मोठी असें असतां, आपले आपल्यांत असें करणें नीट नाहीं. कराराचे कलमांत अंतर येतें. इंग्रजास राजकारणास जागा दरज राहाती. इतक्या गोष्टी नीट नाहींत. हे सर्व पर्याय नवाबबहादूर यांचे खातरेंत आहेत. तुह्मींही खोलून दरजे सांगून हांगामा मना होय, हें आधीं करावें. नवाब निजामअलीखां बहादूर यांची फौज अदवानीचे बंदोबस्तास गेली. बहादरांचे घरची शादी जाली. याउपरीं अदवानीचा हांगामा मना होऊन सत्वर चेनापट्टण प्रांतीं नमूद व्हावें. ह्मणजे नवाबही सिकाकोलीकडे जातील. त्यांची फौज वगैरे सर्व तयारी जाली. इकडीलही फौजा गुजराथ प्रांतीं गेल्या. सरदारही लौकरच जाणार. दिवस निपट थोडे. त्वरा करावी. करारप्रमाणें कामें उगऊन तुह्मीं यावयाचें करावें. र॥* छ २० जिल्हेज बहुत काय लिहिणें, लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries