मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

धामापूर व मावलगे केले होते मग दोन वर्षाचा ऐवज साडे तीन हजार लाहारी त्या कडेस राहिल्या बाकी खडावयासी केशव नायक मागत होते परतु ते देत नात बाकी बदल गडा वर ओलीस राहा ह्मणत तेव्हा नारोवा नायकी उत्तर दिले की आह्मास वतन न लगे आपणा जवल द्रव्य द्यावयास नाही आणि आपणास गडावर राहावे ना ऐसे बोलोन समस्त दायादास पत्र लेहोन दिले जे आपण वतन सोडिले आपणास पुत्रपौत्रादिका वतनासी सबध नाही त्या पासून ते वतनास तुटले केशव नायकी कासीकराची कर्जे काडून विज्यापुरीचे कर्जबाकी वारिले केशव नायक प्रभावलीत असत गणोवा नायक सगमेश्वरी राहिले केशव नायकास पुत्र नाही गणोवा नायकास क्षयवेथा जाहाली ते डोली करून माहायात्रेस गेले केशव नायकाचा प्रात समय आला तेधवा सगमेश्वरीच्या घरी आले कासीकराच्या देण्याचा व देशमुखीचा भार कोणी दायादा मध्ये मान्य न करी तेधवा आपल्यास लवल्याहून आणून आपल्या गली सिके घालून वतन व कर्जाचा भार घालून बोलिले जे सोमाजी तू आपला पुतण्या गणोवा नायक वाराणसीस गेले ते आले तर बरे च नाहीतर सर्व वतन इनामती तुझ्या स्वाधीन असे ऐसे बोलोन ते उतमलोकास गेले नारोवा नायकी वतनसबध नाही आपण पुत्रपौत्रादिकी वतन सोडिले ऐसे पत्र देऊन आपण वेझरे गावी राहिले त्याचा पुत्र वेझरात विसोवा आहे या प्रमाणे पूर्वील वशावली व वतनाची स्थित असे या उपरीची स्थिति सोमाजी नायक देशमुखी करीत असता गणोवा नायक रोगमुक्त होऊन तीन वर्षी देशयात्रेहून देशास आलिया वर सोमाजी नायकी वडीलाचे सिके व वतन गणोवा नायक चुलते याचे स्वाधीन केले मग गणोवा नायकी च्यार वर्षें देशमुखीचा कारभार केला सोमाजी नायकास विज्यापुरास पाठविले त्याणी बरा उत्कर्ष केला सोदेची मसलत पातशाहा पासी मान्य केली तेव्हा कोलबेचीं बाग व कुवेसीवाडी इनाम घेतली माखजून गाव व उचगाव इसाफती घेतल्या प्रभावलीचा हवालदारास वैर जाहाले ह्मणऊन मागती विज्यापुरास गेले तीन वर्षे राहोन साहा हजार लाहारी दरबारखर्च करून हवालदार तगीर केला दाभोलच्या सरदेशमुखीची ताकीदपत्रे व हक लाजीमा करून घेतला प्रभावलीची सोनारवाडी इनाम व निवे गाव इनाम मिरास खोती करून घेतली प्रभावलीस आली त्या

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries