मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ११२
१६४५ ज्येष्ठवद्य १४

श्री
वेदमूर्ती राजश्री गोपालभट व केशवभट गिजरे जोतिशी मौजे कारवे व मौजे वडगाऊ व मौजे सेरे गोसावियासि पोष्य कृष्णाजी विठल नमस्कार सु।। सलास असरीन मया अलफ तुह्मामध्ये व शामभट प्रथमशाकी व भीवभट समुद्रखानी यामध्ये सदरहू गावीचे जोतिशपणाचा कथला होता त्यास गोतमुखे उभयताचा निवाडा जाहला शामभट व भीवभट समुद्रखानी खोटे जाले तुह्मी खरे जालेत सदरहून तीन गावीचे जोतीश तुमचे तुह्मास दुमाला करून सेरणी रुपये १०० एक से करार करून सदरहू रुपये  राजेश्री भास्कर गोसावियास देविले ते साताराचे मुकामी त्यास प्रविस्ट जाले मजुरा असेत छ २७शाबान

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries