मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १२४
१६७६ फाल्गुन शुद्ध १४

श्री

राजश्री मोकदमानि मौजे सैदापूर गोसावी यासि

ठेवणाईत नरसनाक परवरी म्हार मौजे मजकूर सु॥ खमस खमसैन मया अलफ आह्मी परागदा होऊन अजीपर्येत बारा वरसे वाट पाहिली परतू माजी दाद केली नाही हली तूर्त सध्या उदईक होलिकापूजेन आले आहे तर साहेबी मौजेमजकूरचे माहार यास ताकीद करौन होलीस पोली बादितील त्यास ताकीद करौन माजी वाट जाहालियाखेरीज मजला गावावर नेहल्याविना होलिकापूजेन केले तर दैसमूख दैसपाडे याची दोही असै याउपर करोन होलीस पोली बाधली तर जिकडे माजी दाद होईल तिकडून करौन घेऊ पस्ट समजौन लिहिले असे बहुत काये लिहिणे कृपा कीजे हे विनती

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries