मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १३८

श्रीरामचद्र

वेदमूहुर्ती राजश्री नारायेणभट गिजरे तीर्थउपाध्ये क्षेत्र कराड स्वामीचे सेवेसी

सेवक भगवतराउ रामचद्र कृतानेक नमस्कार विनती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहिले पाहिजे विशेष माहादाजी खडेराऊ याजपासून काही अप्रमाद घडोन आला या करिता हाली श्री स्नानास तुह्माकडेस पाठविले आहेत ऐसीयासि येथाशास्त्र प्रायेचीत देऊन शुधपत्र दाहा ब्राह्मणाचे विद्यमाने देऊन पाठविले पाहिजे छ २२ रमजान कृपा असो दीजे हे विनती पा। हुजर

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries