मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १८५
१७४७ श्रावणवा। १४

श्रीमुद्गल
स्वामी

वेदमूर्ति राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण व राजकीय
ग्रहस्त का। ह्मसवड स्वामीचे शेवेसी

शेवक रघुनाथराव रामचद्र पडितराव नमस्कार विनती उपरी विशेष श्री सस्थान मठकरवीर याची स्वारी सच्यार-उद्देशे सातारियास आली होती ती च्यातुर्मास्याचे निकडी मुळे राजश्री हणमतराव दिवाण यास सातार मु॥ ठेऊन करवीरास निघोन गेली तुह्मा समस्ता कडील पूजाद्रव्य यावयाचे या करिता श्रीकडील कारकून राजेश्री मोरो बलाल जोसी यास पा। आहे तरी तुह्मा समस्ता कडील पूजाद्रव्य जमा करून मा।रनिल्हे जवळ स्वाधीन करून पा। द्यावे ह्मणजे श्रीकडे प्रविष्ट होईल कोणे गोष्टीचा अदेशा घेण्याचे कारणे नाही कलावे रा। छ २७ मोहरम सु॥ सीत अशरैन मयातैन व अलफ बहुत काय लिहीणे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries