मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २०५
१७७८ फाल्गुनवद्य ३

श्रीशंकर
सिक्का नक्कल

श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभरती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायण स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व जोतिषी व राजकीय ग्रहस्थ व देशमुख देशपाडे व पाटील कुलकर्णी राहणार कसबे उबरज परमसिष्योत्तम यासी विशेषस्तु शके १७७८ नलनामसवत्सरे सस्थानदेवतेच्या स्वारीचे सचारउद्देशे सातारप्रातीं आगमन जाहले समयी गावगन्नानि पाहता हिंदुलोकात ज्ञातिधर्मास विरुद्ध वहिवाट होत असलेचे दिसून आले सबब ये विसीचा विचार सस्थाना कडून जाहला पाहिजे या करिता सदरहूच्या बदोबस्तास सस्था कडील मठाधिकारीपणाचे कामावर वो। राजश्री नानी बिन कृष्ण दीक्षित व सिताराम दीक्षित बिन बाबा दीक्षित उबराणी राहणार पाल या उभयतास नेमून आज्ञापत्रे दिली आणि ज्ञातिधर्मात विरुद्ध वागतील त्याजविसीचे सस्थानी कळून आज्ञे प्रमाणे बदोबस्त ठेवीत जाणे असी आज्ञा जाहली त्याज प्रमाणे सदर उभयता उबराणी यानी तजवीज ठेविली असून श्रीक्षेत्रकरहाटकस्थ ब्रह्मवृद यानी मठाधिकारीपणाचे आज्ञापत्र घेतले त्याज बद्दल उबराणी उभयता याज बरोबर द्वेष करून निग्रहपत्र पालीकर ब्रह्मवृद यासी लिहिले त्याची नक्कल उभयता उबराणी यानी हजर केली ती अवलोकनात येऊन हे आज्ञापत्र तुह्मास सादर जाहले असे तरी सदर कराडकर यानी उभयता उबराणी यासी द्वेषबुद्धीने निग्रहपत्र लिहिले हे अयोग्य आहे मठाधिकारी वगैरे याची वहिवाट पाहून निग्रह ठेवणे अगर शुद्ध करणे हा अधिकार मठकरवीरसस्थानचा कराडकर यानी दरम्यान धादल करून पत्र लिहिले हे बरोबर नाही कराडकर हे परभारे धादल करितात ए विसीचा बदोबस्त सवस्थानातून होणे प्रकारे होईल तुह्मी सदर्हू उभयता मठाधिकारी उबराणी राहणार पाल याचे घरी व पक्तीस अन्नोदकवेव्हार पूर्ववत्प्रमाणे करीत जाणे आणि कराडकर याणी पत्रे लिहितील ती कोणी मानू नये ज्ञातिधर्माचे कामात हिकडून ह्मणजे मठकरवीरसस्थाना कडून आज्ञापत्रे एतील तदनुसार तजवीज ठेवितील सदर्हू उभयता उबराणियासी सस्थाना कडील मठाधिकारीपणाची आज्ञापत्रे दिल्ही आहेत त्याज प्रमाणे वहिवाट ठेवणे विशेष लिहिणे ते काय मि।। फाल्गुणवद्य ३ महानुशासन वरीवर्ति मोर्तब असे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries