मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २६१ बाळबोध

श्री
श्रीमत राजेश्री बाबासाहेब व रावसाहेब भावुसाहेब मत्री मजरे तुकाईचि वाडी
व शितारामभट बिन कृष्णभट उबराणि पालकर यानि अमचे देशातिल पूर्विपासून साप्रदाय मठाधिपत्याचा नसून श्री स्वामि जगद्गुरु याज पासून मठाधिकाराचे अपले नावे मशारनिले यानि पत्र करून घेतले परतु पदप्रायश्चित वगैरे अचारव्यवहार जे कर्णे ते क्षेत्राहुन होत अले त्याचि माहिति अपणास हि आहे असे असोन हा क्षेत्राचा अधिकार अपण करावा या दुरबुत्धिने पत्र करून घेतले हा मजकूर क्षेत्री श्रुत जाहला या स्तव ते क्षेत्राचे द्रोहि आहेत याज करिता अपणास लिहिले आहे तर भडजि उब्रराणि याशि व याचे घरि अन्नोदक व्यवहार कोणि करू नये असा निग्रह ठेवुन पत्राचे उत्तर यावे कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हा अशिर्वाद मिति फालगुन शुध्ध ५

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries