मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ५२

गोदो पटेल मौजे सेरी याप्रती केसवराय पंडित मजमूम मालिक दिवानआला आशिर्वाद उपरी रघुभटासि व गोविंदभटासि'मौजेमजकुराचे जोइसीचे वेव्हार होते तेथें चि, निवाड करणे ह्यणौउनु त्यासि तेथे पाठविलेया तुह्मी रघुभटावरी ज्यादती केले हे काय. ह्मणिजे आता हकहुरा व समस्त महजन कसबे करहाड व हकहुवार होउनु धर्मता निवारिता ज्याचे मिरासि होईल त्यासि देवणे अधर्म न कीजे ब्राह्मणाचे घर तुरकासी दिल्हे ह्यणे हे काय आहे आता याचे घर यासी दीजे दुसरेनी फिरीयादी आलेया बरवे नव्हे जाणिजे लिखितदरशणे रघुभटाचे घर रघुभटाचे दुबाला करूनु वेव्हारासि न पाठविसी तरी तू जाणेसी पटेलगी करूनु वाईट काम हाती धरणे हराम आहे ते हे बरवे नव्हे याचे असबाबू घर देउनु याचे दुबाला करूनु खुर्द वेव्हारसी पाठविजे मोर्तबू

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries