मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ७४
१६१९ श्रावणवद्य २

श्रीराम

सौ। मोकदमानी मौजे सैदापूर उरुप सिवापूर पा। कराहाड यासी रुद्राजी चदो देसकुलकर्णी पा। कराहाड सु।। समान तिसैन अलफ बो। सनद राजेश्री पडितराउ तेथे आज्ञा केली की श्रीचा अभिसेक बारा महिने वेदमूर्ती वीरेस्वरभट बिन विस्वनाथभट गिजरे सेकिन का कराहाड हे राजेश्री : छत्रपत स्वामीचे तीर्थपुरोहित यासी आज्ञा केली जे श्रीचा अभिसेक बारा महिने करावा तेणेकरून राजेश्री छत्रपती स्वामीचे कल्याण व राज्याचे कल्याण होये ह्मणोन वेदमूर्तीस अभिशेक मागितला त्यास उपजीविकेस इनाम जमीन दर सवाद मौजे सैदापूर उरुफ सिवापूर तेथे जमीन विघे । तीस असल देविले आहेती वेदमूर्तीचे दुमाला कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी दुमाला केले आहे सदरहू जमीन भटगोसावी याचे दुमाला करणे ह्मणोन आज्ञा आज्ञेप्रमाणे राजेश्री सरसुभाची सनद आहे त्याप्रमाणे वेदमूर्तीचे दुमाला इनाम स्वाधीन करणे दुसरेने बोभाट येऊ न देणे जाणिजे रा। छ १५ माहे मोहरम

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries