मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

रामचंद्रपंत सुभेदार सोलापूरकरास.                                         लेखांक १४.                                             १७१४ कार्तिक वद्य ३०.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत सुभेदार स्वामीचे सेवेसीं-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष मौजे भारंबे प॥ मार्डी येथील रखवाली राजश्री अंताजी निराजी यांजकडे असावी याप्रमाणे समक्ष ठरून आपलीं पत्रे सोलापुरीं पाठविलीं त्याप्रमाणे कांहीं दिवस तिकडून गांवास उपसर्ग न लागतां रखवालीचा बंदोबस्त म॥रनिल्हेनीं केला ऐसे असतां सांप्रत कोणी गैरवाका समजाविल्यावरून मौजे म॥रास रखवाली विषई उपसर्ग होतो ह्मणोन कळलें त्यावरून लिहिलें असें त्यास येविषई पेशजी ठरल्याप्रमाणें ताकीद निक्षून देऊन गांवास तोसीस न लागे ऐसा बंदोबस्त व्हावा पेशजी बंदोबस्त आपण पत्र पाठविलें त्याजवर जाली हालीं आपण स्वस्थानास आल्यावर गांवास उपद्रव लागणें आश्चर्य आहे र॥ छ २८ र॥वल बहुत काय लिहिणें लोभ असो दिजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries