मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

रंगराव निा रोशनखान यांस पत्र.                                                    लेखांक १७६.                                                      १७१५ चैत्र वद्य २.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रंगराव स्वामीचे सेवेसीपो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे मोकाशाची ठाणी पा वसमत एथील सेंदूर-सणे वगैरे गांव पेशजीपासोन बहुत दिवस आहेत यांजकडील गांवास आजपर्यंत कोणीं इजा दिल्ही नाही ऐसे असतां सांप्रत ठाण्याचे गांवास तुह्माकडून उपसर्ग लागतो ह्मणून बोभाट आला त्यावरून लिा असे त्यास यांचे ठाण्याचे गांव पूर्वीपासोन मोकाशाकडे आहेत त्यास उपसर्ग देण्याचें कारण काय याउपरि ठाण्यास इजा न लागे ऐसें व्हावें रा छ १६ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries