मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

बळवंतराव लक्ष्मण सेकूकर                                                       लेखांक २२१.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ८.
यांस पत्र मोहसन अलीखान
यानीं मागितलें सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीयें लिा जावें विशेष का विसाद सरकार नांदेड जागीर मोहसनुदौलाबाहदूर यांजकडे तेथील बाबतीचे अमलाचा मामुलप्रा सालबसाल यांजकडील अमीलानी फडच्या करून देऊन रसीदा घेतल्या असतां तुह्मी दोन सालें इजाफा रुो मामुलासिवाय ज्यादा तलबी करून घेतले याचें कारण काय वाजबी अमीलाचा फैसला मामुलबमोजीब करून घेऊन गैरवाजबी ज्याजती ऐवज घेतला तो यांचे यास द्यावा व मवेसी चीजबस्त नेली असेल ते माघारी द्यावी येविषई नवाजे बंदगानअली व अजमुलउमराबाहादूर यानी आह्मास सांगितल्यावरून पेशजीहि तुह्मास पत्रें पाठविली परंतु फडच्या होत नाहीं हें काय सांप्रतहि नवाबानी सांगितलें त्यास इजाफा ऐवज व मवेसी घेतली असेल ते देऊन पुढें सुरळीत अमल घेत जावा गैरवाजबी बोभाट न ये तें करावें रा छ ७ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries