मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

तिमाजी कृष्ण सुरापूरकर यांस                                                     लेखांक ४४.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य ३.
पत्राचे उत्तर रा छ १५ राखर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमापा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष तुह्मीं दोन पत्रें पाठविली ती पावोन लिहिल्या प्रा। तावार मार समजला राजश्री श्रीपतराव यांस समाधान नाहीं सबब घरास गेले ह्मणोन लिा तें कळलें राजश्री गोविंद आपा व सुबराव उभयतां चिणमेल्यास गेले तिकडून आल्यावर पुण्यास घेऊन जातों ह्मणोन लिा त्यास सिवापा याणी लाखाची पावती व सिबंदी बाबत ऐवज मागों नये याप्रा पत्र आणोन देण्याचा करार बहिरी बाहादुर यांसी करून चिणामेल्यास गेले ऐसे तुमचे लिहिण्यांत त्यास कराराप्रा दोन्ही जाबसालांविषयीं पत्र आणिलें कीं नाहीं हें तावार ल्याहावें गोविंदआपा व सुबराव यांस इतक्यावर तुह्मीं पुण्यास घेऊन जाणार मग जाबसाल ठरणार या गोष्टीस लांबण फार पडती मंत्रीसी बोलण्यांत आल्याप्रा जाबसालाचा ठराव लौकर होऊन आल्यांत केले कामाचें सार्थक याजकरितां लौकर जाबसाल व्हावा यांत चांगले बहिरी बाहादर यांचेहि शरीरीं स्वस्थ नाहीं ह्मणोन तुह्मीं लिहिलें त्यास हली मारनिलेचे प्रकृतीस समाधानाचें वर्तमान कसें तें लेहून पाठवावें रा छ १६ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries