मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                              लेखांक ७३.                                                         १७१४ पौष शुद्ध १३.

पु।। राजश्री राजे बळवंत बहेरी बाहादूर गोसावी यांसी-
विनंति उपरि नवाब अजमुलउमरा बाहादूर याणी दोन च्यार वेळां सांगून पा कीं तिमाराव व श्रीपतराव एथून जाबसाल बहेरी बाहादूर यांजकडे घेऊन गेले आहेत त्याचे उत्तर अद्याप समजले नाही न पैका न करारनामा कोणताहि जाबसाल आमलांत आला नाही त्यास या उपरि तदारुक करावा कीं काय जसें सांगाल तसें करावयास येईल त्याजवरून आह्मी बाहादूर-मवसूफ यांस सांगून पा की बहेरी-बाहादूर याची तबीयत मांदी आहे जाबसाल करण्याची ताकद नाही त्यास आराम होऊन उत्तर येईल त्या प्रो सांगून त्यास तिमाराव व श्रीपतराव यांस एथून जाऊन दोन अडीच महिने जाले परंतु अद्याप उत्तर आले नाही आह्मी यांस उगेच प्रसंग पाहून सांगितले आहे त्यास याउपरि पेशजी उभयतां यादी कराराच्या तुह्माकडे घेऊन आले आहेत त्यांची उत्तरे लौकर रवाना करावी त्या प्रो बाहादूर-मवसूफ यांसी बोलावयास येईल या कामास अलस होऊ नये रा छ ११ जावल हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries