मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

 [९१]                                                                         श्री.                                                           

श्रीमत् महाराजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेशी.

चरणरज बापूजी गणेश चरणावर मस्तक ठेऊन शिर स॥ नमस्कार विनंति. येथील वर्तमान अश्विन वद्य तृतीया परियंत स्वामीचे आशीर्वादेकरून यथास्थित असे. विशेष. स्वामीच्या दर्शनास राजश्री सदाशिव नाईक रास्ते आले आहेत. याजपासून पत्र घेऊन याशी चिट्टी दिली पाहिजे. याचा हेत स्वामीनें आज्ञा केली आहे, त्याहीपेक्षां दोहोचा अधिक आहे. तेव्हां पाहिजे तेव्हां सेवेशी हजीर होऊं ह्मणून नेम करितात. पाहतां, अंतर पडणार नाहीं, ऐसें दिसतें. चित्तास आलें तर दिल्हे पाहिजेत. दीडप्रमाणें हे मान्य आहेत. एकाची रदबदल्याची आहे, ह्मणून सेवेशी आले आहेत. तर याचें समाधान स्वामीनें राखोन चिट्टी दिली पाहिजे. सेवेशी श्रुत होणें. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries