मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१०५]                                                                          श्रीभार्गवराम.                                                   
                                                       
श्रीमंत परमहंस स्वामी यांहीं सहस्रायू चिरंजीव धोंडोपंत यासी आज्ञा केली जे :- तुह्मीं लिहिलें कीं अनेवाडीची पहाणी आली, वीरमाडें मोजीत असों, एका दो रोजीं मोजणी होईल, पुढें समजाविशीस व हिशेबास आठ पंधरा दिवस लागतील; व मनुष्यांविषयीं चिंता केलीत, व आणीकही कित्येक आह्माकडील वर्तमान लिहिलें, तें विदित जालें. तुमचीं मनुष्यें तुह्माकडे पाठविलीं आहेत. अनेवाडी, वीरमाडें धावडशी येथील वेठे आणून तुह्मी तिघेजण कारकून ओळीनें घरें बांधून सुखरूप राहणें. जे काय न्यूनता असेल त्याची पूर्णता करूं. कोणेविशीं चिंता न करणें. गांव तो फुटले आहेत. तुह्मी खालीं न येणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें हे आज्ञा. जीव गेला, धाशत वारली; यांही आतां आमचे काय करावें ? राधा व तूं व बापू हीं तुह्मी खालीं याल तर तुह्मांस माझ्या पायाची आण आहे. महादाजीपंत येतील त्यास येऊं देणे. तुह्मांस जें पाहिजे तें पाठवून देऊन तुह्मांस रुपये १५, व बापूजीपंतास रुपये १५, व चिमणाजीपंतास रुपये वीस, बकशीस, याची तुलवटें घेणें. तुह्मांस दुबतें नसेल तर वाड्यांतून ह्मशी दोन, बापू व तुह्मी घेऊन जाणें. हे आज्ञा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries