मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३१४]                                                                       श्री.                                                                १५ सप्टंबर १७४३

श्री सकल तीर्थस्वरूप श्री परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना तागाईत भाद्रपद बहुल त्रयोदसी सौम्यवार पावेतों अपत्यांचें व ये प्रांतींचें वर्तमान स्वामीचें कृपावलोकनेंकडून यथास्थित जाणून आपणांकडील संतोषवृत्त निरंतर आशीर्वादपत्रीं लेखन करावयास आज्ञा करून अपत्यांचा परामृष करीत गेलें पाहिजे. विशेष. कृपापूर्वक आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्टकाली लेखनार्थश्रवणें आनंदावाप्ती होऊन प्रसाद व वस्त्र शिरसावंदोन गौरवाभिवृध्दीस पावलों. याच न्यायें सदैव सांभाळ केला पाहिजे. वरकड कितेक जिनसांविशी आज्ञा केली, त्याजवरून ह्मैसी वगैरे जिन्नस समयानुसार सिध्द होता, त्याची रवानगी केली आहे. याद आलाहिदा असे. याजवरून श्रृत होईल. अपत्यांवरी कृपा करून मान्य केला पाहिजे. देव्हाराही सिध्द करवून पाठवून देतों. स्वामीचे सेवेसी अपत्यांपासून अंतर पडणार नाहीं. तथापि आज्ञेप्रमाणें रवानगीस दिसगत लागली तरी कृपा करावयास स्वामी समर्थ आहेत. अपत्यांचा हेत तरी कायावाङ्मनसा स्वामीचे चरणावर विदित आहे. अन्यथा दुसरा विचार नाहीं. अंतरसाक्ष स्वामी आहेत. तेथें विस्तारयुक्त लिहावें असें नाहीं. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries