मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३५६]                                                                      श्रीभार्गवराम.                                                               

श्रीमत् महाराज परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज मल्हार हरी कृतानेक विज्ञापना. येथील कुशल स्वामीचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन मस्तकी वंदिले व लिहिला अभिप्राय कळो आला. ऐशास श्रीनें आह्मांवरी कहर केला ! केवळ निराश्रित उघडे पडिलों ! याउपरी स्वामीच्या पायांविना दुसरा अवलंब व आश्रा नाहीं ! येविशींचा सविस्तर अर्थ सोमाजीजवळ बोलिलों आहे. सेवेसी निवेदन करील त्यावरून श्रुत होईल. सारांश, पहिल्यापासून स्वामींच्या आशीर्वादाचे आहों. स्वामी सेवकाचे अभिमानी आहेत. पूर्ण अभिमान धरून सर्व प्रकारें कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. स्वामीच्या पायाविना दुसरें दैवत नाहीं. मायबाप सर्व स्वामीचे पाय आहेत. सर्व पदार्थें स्वामीच्या पायाविना आश्रय दुसरा नाहीं. येविशीचा सविस्तर अर्थ सोमाजी निवेदन करितां कळेल. बहुत काय लिहूं. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विज्ञापना. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries