मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

सत्यमिथ्य न कळे. शामराय बहुतसा स्नेह करितात. ममतेच्या गोष्टी बोलतात. नम्र बहुत आहेत. कृष्णराव पुण्यांतच आहेत. यादवरावही तेथेंच आहेत. यानंतर राधाबाई पेशवी व काशीबाई जोशांची वारली. हें वर्तमान पूर्वीं दोन पत्रीं लिहिलें आहे. पावलें असेल. न कळे. बाबा फाठक सावखेडपात आतुर संन्यास घेऊन समाप्त झाले, हेंही पूर्वीं लिहिलें आहे. वरकड वर्तमान सर्व यथास्थित असे. कृष्णाजी नाईकांचे पुत्राचे कार्यास कासीद अर्जुदार पुण्यास वडिलांनीं पाठविला होता, त्यास आह्मीं येथें रुपये ४ चार खर्चास दिले आहेत. तेथें घ्यावे. पूर्वीं लिहिलेंच आहे. राजश्री बापूजीपंतांचे भांडयाचे रुपये एकशेंसाडेपंधरा आपणाकडे आहेत. तेथे देऊन लेहून पाठवावें. आजकाल हुंडणावळीचा भाव आटेनें सात आठ यापावेतों आहे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार. तीर्थस्वरूप बाबा वडिलांचे सेवेसी. अपत्यें गोविंद दीक्षित, रामचंद्र उभयतांचे साष्टांग नमस्कार. लिखितार्थ परिसीजे. बाजीचे साष्टांग नमस्कार. महादेव सोमण याचे साष्टांग नमस्कार. वेदमूर्ति आत्माराम जोशी याप्रति गोविंद दीक्षित नमस्कार. उपरि तुमचीं पत्रें तुमचे घरीं पावतीं केलीं पाहिजे. कळलें पाहिजे. वेदमूर्ति केशवभट यांप्रति नमस्कार. वेदमूर्ति बाळंभट शौचे यांप्रति नमस्कार. येणाराबरोबर सविस्तर लिहिणें. राजश्री बापूजी महादेव यांप्रति नमस्कार. उपरि तीर्थरूपांचे पत्रावरून सविस्तर कळेल. तुमचे भांडियाचे रुपये ११५॥ एकशेंसाडेपंधरा सरकारांत आहे ते घ्यावे. वरकड तुह्मीं कार्तिकपत्रीं सविस्तर लिहिलें कळोन समाधान जालें. याचप्रकारें सविस्तारें लिहीत जावें. राजश्री बाबूराव सुखरूप आहेत. चिंता न करावी. यानंतर चिरंजीव मथीस रजोदर्शन ज्येष्ठांत जालें. कळलें पाहिजे. लोभ असों दीजे. हे नमस्कार. सेवेसी भिकाजी महादेव साष्टांग नमस्कार. श्रीमंत उभयतां दीक्षित स्वामीचे सेवेसी. सेवक भिकाजी महादेव साष्टांग नमस्कार. विनंति. राजश्री गोविंद दीक्षितांचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करितों. हे विज्ञप्ति. राजश्री गोविंदपंत वागदे यांप्रति आशीर्वाद. तुमचीं पत्रें पावतीं केलीं.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries