मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[५५७]                                                                        श्री.                                                                   ४ जानेवारी १७५९.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्रिया विराजित वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक चरणरज शिवभट साठे चरणावरीं मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान ता छ ५ माहे जमादिलाखर रोज आदितवार पर्यंत सुखरूप असे. उपर. आपलें वर्तमान तर वसंतपंचमीस बंगाल्याचे सुभेदारीचा शिरपाव जाला. बहुमान जाला. दुसरें, पहिले रा हंसपुरी गोसावी यांची व श्रीमंतांची बहुत चित्तशुध्द नाहीं. श्रीनें ऐसें केलें जे तुमचे आशीर्वादें तो पराभव जाला. आजी रा जानोजीबावाशीं व कुल मुत्सद्दीयांशीं व गोसावी मजकुराशीं चित्तशुध्द नाहीं; आणि आपले तैनात रा तुळजोराम या बराबर व आपले बराबर चार पांच हजार स्वार व पहिले आपले स्वार हजार ऐसा जमाव घेऊन जातो. आपला पहिला हेत होता जे स्वामीजीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. ऐसा फार हेत होता. परंतु येथें प्रसंग बंगालियाचे मामलियाचा योजून आला, आणि त्या प्रांतांत आपला दहा पाचा लाखांचा गुंता ऐवज मुबदला आहे ह्मणून कबूल केलें. नबाब निजाम अल्ली व रा जानोजीबावा यांचा बिघाड जाला होता. त्यावर सोलापूरचे मैदानांत सलूख जाला. आजी भेटीचा प्रसंग योजिला होता. त्यावर हिशोबामुळें उभयतां दोघामध्यें बिघाड जाला. रा मुधोजी भोसले माहूर प्रांतें आले. शिकस्त होईलसें दिसतें. बहुत काय लिहिणें हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries