मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

५ मामलतींत शहाणें असावें.
१ लावणी बिघ्यापर्यंत सांभाळावी.
१ हप्त्याचा वसूल आहे तो आगाव घ्यावा.
१ रयत राजी राखावी.
१ निभावणी होय अशी सरकारकिफायत समजोन करावी.
१ लोभ धरून सीमाहरण किंवा वृत्तिच्छेद करूं नये.

२१ धनीपणाचे गुण

१ कुलिनाचें महत्व रक्षावें.
१ समयोचित नेलें द्रव्य सेवकांस द्यावें.
१ मंत्रीउपदेशीं विश्वास ठेवावा.
१ शत्रू जिंकोन खजीना बाळगावा.
१ प्रजा पुत्रवत् पाळावी.
१ सेना क्षीण करूं नये.
१ मित्र कोण, शत्रू कोण, याचा परिणाम कसा, तो पूर्वीं समजावा. आधीच इरेस पडूं नये.
१ संपादिली कीर्ति संरक्षण करावी.
१ अमात्यपदवी रक्षावी.
१ व्यायाम श्रमसहिष्णी असावा: *हसगे, तालीमखाना, इत्यादिक.
१ दुर्व्यसनाचे अभ्यासाचें आर्जव करील तो शत्रू समजावा.
१ बंधुवर्ग आज्ञेंत ठेवावे; योग्यता पाहून कामास ठेवावे.
१ प्रतिज्ञा सत्य करावी.
१ औदार्य व शूरत्व असावें.
१ दुष्टाचें पारिपत्य करून शिष्टाचें पालन करावें.
१ सेवकजनांचे सुबुध्द पुत्र पाहून अश्वशिक्षेप्रमाणें लहानपणापासून ज्यास ज्या व्यवहाराचें कारण आहे त्या व्यवहारीं एकशिक्षेनें तयार करावे.
१ काम सांगोन कसोटी पहावी.
१ इमानशाबुदी कशी आहे ती दृष्टींत ठेवावी.
१ इमानी मनुष्य, कृतकर्मा दिसेल त्यास वाढवीत जावें.
१ सर्व कारखाने चालवावयाचीं माणसें असतात व स्वराज्यांतील व परराज्यांतील उपयोगी वगैरे त्यांचे माहीतगारीचा शिलशिला जागा परंपरेनें अनुभवयुक्त चालवावा. शिलशिला उठूं देऊं नये.
१ धन्यापासून अमर्यादा व दंड व अधर्म घडल्यास तो धनी प्रजेस मान्य होत नाहीं, हें समजोन, एक मर्यादा हीच खरी संपदा, अशा निश्चयानें धर्म सोडूं नये.
२१

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries