मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

पालनाचे गुण.
कित्ता.

१ आपला वर्णाश्रम धर्म असेल तोच आचरावा.
१ उदरपूर्तीनिमित्य कांहींएक रोजगार करावा.
१ सारें मलाच पाहिजे, मीच करीन, अशी दुराशा वाढवूं नये.
१ दिवसात असें कर्म आचरावें कीं रात्रीस सुखरूप निद्रा यावी.
१ रात्रौ कर्म असें आचरावें की दिवसास पुण्यशीळामध्यें जाऊन बसावें.
१ जें कर्म करणें तें योग्यायोग्य पाहून विवेकेकरून गुरुशिक्षेप्रमाणें करीत जावें.
१ दृष्टीनें, अवलोकनेकरून अथवा श्रवणेकरून अथवा मननेकरून सद्गुणाचा संग्रह करीत जावा.
१ विद्या शिकोन आचरण नाहीं तर तो व्यर्थ, मुखावलोकन करू नये.
१ रोजगारासाठीं महाराची खिचडी उतरावी, आपली चढवावी, असें ह्मणोन ज्या समयीं ज्यास जशी बुध्दी होईल तशी मनस्वी वर्तणूक करितात. हेंच नाशाचें कारण आहे. हा लोभ.
१ विवेक चित्ताचे ठायीं करून अधर्म सोडावा, तो आपण दुसऱ्यास समजवावा.
१ हानि, मृत्यु, यश कर्मानुसार ईश्वर जन्मास घालून भोगवितो. ईश्वरास निवेदन केलें पाहिजे. भोग सरतो. त्यास दुसरा उपाय नाहीं. हळहळ करूं नये.
१ यतो धर्मस्ततो जय:, वचनावर विश्वास ठेवावा. शास्त्राची आज्ञा सार्थकासाठीं आहे. मान्य करावी. हें सार्थक आहे. धर्माची दुसरी परीक्षा पाहूं नये.
१२

सदर्हू पालनाचे गुण लिहिलें आहेत. याप्रमाणें उन्मत्त न होतां आपलें स्वरूप, दैव, बुध्दि, बल, पराक्रम पाहून, दुसऱ्याचें स्वरूप समजोन गुणग्राहक बुध्दीनें लाभाचा प्रतिपाल
केला तर तो वंशपरंपरेनें लाभदायक होईल.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries