मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ३६ ]

श्री. शके १६५० माघ वा। ३.

राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसी :--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो। बाळाजी विश्वनाथ आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुषल लेखन करणे. विशेष. तुह्मांकडे हुजूरचा दरमाहेचा ऐवज सरदेशमुखीचा येणें आहे. त्यापैकीं विद्यमान राजश्री राघोपंत रुपये १९८० एकुणसेऐशी पाठविले. त्यापैकीं वजा बहुडा रुपये २० वीस. बाकी जमा पोता रुपये १९६० एकुणसेसाठी, जमा जाले असेत. फाल्गुणमासाचा हप्तापैकी पावले असते. जाणिजे. छ० १७ रज्ज़ब सु॥ तिसा अशरीन मया अलफ. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.

० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ प्रधान.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries