Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ११२ ]

श्रीदत्तात्रेय. शके १६५९ भाद्रपद शुद्ध ९.

० श्री ॅ
राजा शाहू छत्र-
पति स्वमिचरणि त-
त्पर देवराव मेघ-
शाम निरंतर.

देशमुख व मेकादम मा। अनाम व देशपांडे का। सासवड:-

देवराउ मेघशाम सु॥सन समान सलासैन मया अलफ. तुह्मी करार करून गेलेत कीं, जाताच करारप्रों। ऐवज वसूल करून पाठवितों. त्यास अद्याप ऐवजे येऊन पोंहचत नाहीं. यावरून काय ह्मणावें ? हाल्ली देखत आज्ञापत्र जे बाकी असेल ते झाडियानशीं पाठवून देणें. उजूर केलिया कार्यास येणार नाहीं. राजश्री लक्ष्मण माणकेश्वर कमाविसदार का। मजकूर याचे रजेतलबेत वर्तत जाणें. जाणिजे. रा। छ० ७ जमादिलोवल. या कामास नरसोजी जाधव पा। आहे. यास मसाला रुपये पांच देणें. जाणिजे. छ. मजकूर.

लेखन
सीमा.