मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ११९ ]

श्री.

शके १६३९

विनंती ऐसीजे :-- मर्हाटे स्वार तुंगचेतुंग अबदुला नगर व काजीचे सरायेसमीप येऊन लूट लबाड करितात. कितीक लोक जखमी जाले. आपले जत्रांत तो अद्याप सुरक्षित आहे. परंतु जैसिंगपुराचे आसपास स्वार व गंजाचे समीप स्वार येऊन फिरून गेले. आह्मीं आपले ठिकाणी खबरदार आहों. यासमयीं जत्रांचें व पुराचें संरक्षण व गंजाचें जरूर करणार स्वामी समर्थ आहेत.

जैसिंगपुरियाहून चिठी सो। पाठविली असे. तेथून आपले येथें वस्तभाव आणिली तर लोकांत आपलेच लोकाचें भय आपल्यास जालेंसें जालियानें बदनक्षी आहे. व आपले आश्रियानें फार लोक राहिले आहेत त्यांचीही महा फजीती होईल. यास्तव भारबरदार जरूर पाठवणें. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries